मैत्रीचं हे असं असतं
बोलल्याशिवाय उमगत असतं
निर्मळ हास्याचं
ते एक उगमस्थान असतं.
इथं नाती सहजच फुलतात
सगळ्या भेटी निर्हेतुक असतात
हे नातं नसतं कशावर अवलंबून
कारण आलेलं असतं ते हृदयातून.
जीवनाच्या प्रवासात
कित्येक जण येतात अन् जातात
खरे मित्र अन् त्यांची मैत्री
मात्र आयुष्यभर साथ देतात.
आपली कविता ते
लहान मुलाप्रमाणे ऐकतात
आपल्या चिमुकल्या निर्मिताचा ते
मोठयां माणसांप्रमाणे कौतुक करतात.
पडताना आधार देतात
प्रसंगी पाठीवर हात ठेवतात
डोळ्यांतले अश्रू मुक्त करायला
हक्काची एक जागा देतात.
----------------------------------
हिमवर्षाव
Sunday, July 6, 2008
Tuesday, July 1, 2008
भिजणं राहून गेलयं
तेव्हा एक बरं होतं,
पावसाबरोबर पाणिही होतं...
आताही पाऊसही आहे,
आणि पाणिसुद्धा आहे...
पण तेव्हासारखं पावसात
मनसोक्त भिजणं मात्र
राहून गेलयं...
जणू काही जगायचचं
राहून गेलयं...
पावसाबरोबर पाणिही होतं...
आताही पाऊसही आहे,
आणि पाणिसुद्धा आहे...
पण तेव्हासारखं पावसात
मनसोक्त भिजणं मात्र
राहून गेलयं...
जणू काही जगायचचं
राहून गेलयं...
Sunday, June 29, 2008
स्वत:ला विसरुन...
तुला पाऊस एवढा का आवडतो...?
त्या पावसाच्या सरीवर तुझा एवढा का जीव आहे...?
दरवेळी तु इतका आतुरतेनं का या निर्जिव गोष्टींचीं वाट पहातोस...?
तुला एवढं का त्या धुक्यांचं आकर्षणं,
तुला एवढी का त्या पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीची ओढ,
का एवढा तु त्या जानेवारीच्या थंडीसाठी एवढा आसुसलेला असतोस...?
का तु स्तब्ध होतोस समुद्रकिनाऱ्यावर,
सोनेरी वाळूच्या कणांवर...
सागराकाशाच्या मिलनाकडे नजर लावून...?
आजुबाजूला एवढं जग पडलं असताना,
का बरे तु सदाफुलीसारख्या फुलांत गुंतून रहावसं...
हिरव्यागार झाडांच्या सानिध्याची आस धरावीस...
सुर्योदय-सुर्यास्त रोजच होत असताना,
का बरे सगळं नविन आणि ताजं वाटतं तुला,
जीवनाचा प्रत्येक क्षण जगताना...?
अन हे माझं विचित्र समजावणं...
जन्माला आल्यापासुन...
कित्येक लोकं आयुष्यात आली,
कधी प्रेमाचा कधी द्वेषाचा,
कधी प्रोत्साहनाचा कधी अपमानाचा,
कधी निर्मळ आपुलकीचा तर कधी
खोल जखमेचा क्षण देऊन गेली...
जी माणसं जवळची वाटत होती,
ती खूप दूर गेली,
दूरच्या माणसांची रित निराळी,
ती तर प्रसंगापुरतं जवळ येणारी...
हृदयापासुन बऱ्याच अंतरावर असणारी...
हे येणं-जाणं चालूच आहे,
फरक इतकाच कि ती माणसं
कशाकरिता आली आहेत आहेत आणि
केव्हा पुन्हा दुर जाणार आहेत
याचा विश्वास नाही...
खरचं नाही...
पण ज्यांना तु निर्जिव गोष्टी म्हणतेस ना,
त्यांनी कधी मला असं दुर लोटलेलं नाही,
जरा उशीरानं आले असतील,
पण नाही चुकवलं त्यांनी यायचं,
निर्हेतुकपणे दुसऱ्यांच्या जीवनात
रंग ओतून मनाला तजेलं बनवायचं...!
पौर्णिमेचा चंद्र भेटला नसेल गं अमावास्येला,
पण येत आहे ना पुन्हा पुढच्या पौर्णिमेला,
पावसानही आपलं बरसणं थांबवलं नाही,
उशीर केला असेल बऱ्याचदा...!
आणि हे दुधाळी धुके अन्
विसरायला लावणारी थंडी...
यांनी न चुकता मला भेटायला यायचा
नेम अजुनसुद्धा चुकवलेला नाही,
त्यांच्या - माझ्यातलं अंतर
आजसुद्धा कमी झालेलं नाही...
आता तूच सांग मी का करु नये
या निर्जिव गोष्टींवर प्रेम...?
थोडसं जगाला विसरुन...
थोडसं स्वत:ला विसरुन...
त्या पावसाच्या सरीवर तुझा एवढा का जीव आहे...?
दरवेळी तु इतका आतुरतेनं का या निर्जिव गोष्टींचीं वाट पहातोस...?
तुला एवढं का त्या धुक्यांचं आकर्षणं,
तुला एवढी का त्या पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीची ओढ,
का एवढा तु त्या जानेवारीच्या थंडीसाठी एवढा आसुसलेला असतोस...?
का तु स्तब्ध होतोस समुद्रकिनाऱ्यावर,
सोनेरी वाळूच्या कणांवर...
सागराकाशाच्या मिलनाकडे नजर लावून...?
आजुबाजूला एवढं जग पडलं असताना,
का बरे तु सदाफुलीसारख्या फुलांत गुंतून रहावसं...
हिरव्यागार झाडांच्या सानिध्याची आस धरावीस...
सुर्योदय-सुर्यास्त रोजच होत असताना,
का बरे सगळं नविन आणि ताजं वाटतं तुला,
जीवनाचा प्रत्येक क्षण जगताना...?
अन हे माझं विचित्र समजावणं...
जन्माला आल्यापासुन...
कित्येक लोकं आयुष्यात आली,
कधी प्रेमाचा कधी द्वेषाचा,
कधी प्रोत्साहनाचा कधी अपमानाचा,
कधी निर्मळ आपुलकीचा तर कधी
खोल जखमेचा क्षण देऊन गेली...
जी माणसं जवळची वाटत होती,
ती खूप दूर गेली,
दूरच्या माणसांची रित निराळी,
ती तर प्रसंगापुरतं जवळ येणारी...
हृदयापासुन बऱ्याच अंतरावर असणारी...
हे येणं-जाणं चालूच आहे,
फरक इतकाच कि ती माणसं
कशाकरिता आली आहेत आहेत आणि
केव्हा पुन्हा दुर जाणार आहेत
याचा विश्वास नाही...
खरचं नाही...
पण ज्यांना तु निर्जिव गोष्टी म्हणतेस ना,
त्यांनी कधी मला असं दुर लोटलेलं नाही,
जरा उशीरानं आले असतील,
पण नाही चुकवलं त्यांनी यायचं,
निर्हेतुकपणे दुसऱ्यांच्या जीवनात
रंग ओतून मनाला तजेलं बनवायचं...!
पौर्णिमेचा चंद्र भेटला नसेल गं अमावास्येला,
पण येत आहे ना पुन्हा पुढच्या पौर्णिमेला,
पावसानही आपलं बरसणं थांबवलं नाही,
उशीर केला असेल बऱ्याचदा...!
आणि हे दुधाळी धुके अन्
विसरायला लावणारी थंडी...
यांनी न चुकता मला भेटायला यायचा
नेम अजुनसुद्धा चुकवलेला नाही,
त्यांच्या - माझ्यातलं अंतर
आजसुद्धा कमी झालेलं नाही...
आता तूच सांग मी का करु नये
या निर्जिव गोष्टींवर प्रेम...?
थोडसं जगाला विसरुन...
थोडसं स्वत:ला विसरुन...
Subscribe to:
Posts (Atom)