मैत्रीचं हे असं असतं
बोलल्याशिवाय उमगत असतं
निर्मळ हास्याचं
ते एक उगमस्थान असतं.
इथं नाती सहजच फुलतात
सगळ्या भेटी निर्हेतुक असतात
हे नातं नसतं कशावर अवलंबून
कारण आलेलं असतं ते हृदयातून.
जीवनाच्या प्रवासात
कित्येक जण येतात अन् जातात
खरे मित्र अन् त्यांची मैत्री
मात्र आयुष्यभर साथ देतात.
आपली कविता ते
लहान मुलाप्रमाणे ऐकतात
आपल्या चिमुकल्या निर्मिताचा ते
मोठयां माणसांप्रमाणे कौतुक करतात.
पडताना आधार देतात
प्रसंगी पाठीवर हात ठेवतात
डोळ्यांतले अश्रू मुक्त करायला
हक्काची एक जागा देतात.
----------------------------------
हिमवर्षाव
Sunday, July 6, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment